Sunita Williams return to Earth कधी परतणार सुनीता विल्यम्स अंतराळामधून?
Sunita Williams Stuck: भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर यांची पृथ्वीवर परतण्याची वाट पूर्ण जग बघत आहे NASA च्या एका अंतराळ मोहिमेसाठी हे दोघेजण 5 जून रोजी इंटरनॅशनल स्पेस सेंटर या ठिकाणी गेले होते तर मागील 70 दिवसापासून हे दोघेजण या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थान International space center) मध्ये अडकून पडले आहेत जी मोहीम 8 दिवसांमध्ये पूर्ण होणार होती ती यानाच्या तांत्रिक बिघाडीमुळे वाढत गेली आणि आता वेळ अशी आली आहे की जवळपास 70 दिवसापेक्षा जास्त दिवस होऊनही हे अंतराळवीर पृथ्वीवर अजूनही परतू शकले नाही. याना मध्ये तांत्रिक बिघाड होऊन हेलियम गळती होत होती त्यामुळे नासा ने त्यांना तिथेच थांबण्याचे निर्देश दिले होते. NASA सर्वोत्परी प्रयत्न करत आहेत की ज्यामुळे ते दोघेजणी पृथ्वीवर परत येऊ शकतील हे सर्व घडण्याची आता एकेक कारण नासाकडून समोर येत आहे पाच जून रोजी जी मोहीम सुरू झाली होती त्या यानाचं नाव होतं बोईंग स्टारलाइनर या बोईंग स्टारलाइनर मध्ये जे थ्रस्टर असतात जे की यानाला गती देण्याचे काम करतात त्या थ्रस्टर मध्ये काही तांत्रिक बिघाडी झाली होती. तरीही ते या इंटरनॅशनल स्पेस सेंटर पर्यंत सुखरूप पोहोचले याना मध्ये 28 थ्रस्टर होते त्यापैकी पाच हे प्रवासाच्या दरम्यानच बिघडले होते आणि त्यामुळेच हेलियम गळती होत होती या कारणामुळे सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर हे त्या अंतराळ मध्ये अडकून पडले.
कसे परत येऊ शकतील अंतराळवीर?
NASA च्या समोर दोघांना सुखरूप पृथ्वीवर परत आणण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यांना परत आणण्यासाठी नासा Elon Musk यांची कंपनी Space x ची मदत घेऊ शकते. जर सर्व काही सुरळीत असेल तर space x च्या ड्रॅगन कॅप्सूल ने पृथ्वीवर परतू शकतात पण या सर्वासाठी लागणारा वेळ हा चिंतेचा विषय आहे .या कॅप्सूल द्वारे ते फेब्रुवारी 2025 पर्यंत पृथ्वीवर पोहचू शकतील.
नाहीतर वाफ पण होऊ शकतात दोन्ही अंतराळवीर.
Astronaut Sunita William and Butch Gilmore
हे international space station मधून पृथ्वीवर परत येण्यासाठी 3 मोठे संकट त्यांचा समोर असतील अशी धास्तावणारी शंका अमेरिकी लष्कर अंतराळ कमांडर रुडोल्फी यांनी व्यक्त केली आहे. बोईंग स्टार लाइनर कॅप्सूल हे पृथ्वीवर परत येण्यासाठी योग्य दिशेत आणि योग्य कोणात असणे फार गरजेचे आहे ते जर योग्य दिशेत योग्य कोणामध्ये नसेल तर हे संभाव्य धोके होण्याची शक्यता जास्त आहे.
1.स्टार लाइनर अपेक्षित ठिकाणी ठेवले गेले नाही तर ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतेवेळी परत स्पेस मध्ये फेकल्या जाऊ शकते आणि यामुळे अंतराळवीर हे स्पेस मध्येच अडकून पडतील आणि त्यांच्याकडे फक्त 96 तासांचाच ऑक्सिजन साठा शिल्लक असेल.
2. दुसरा धोका असा की अंतराळवीरांना जर पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करता आला नाही तर ते अंतराळामध्येच अडकून पडतील आणि त्यांना तिथेच संकटाचा सामना करावा लागेल.
3. पृथ्वीवर येण्यासाठी यान जर चुकीच्या कोणामध्ये येत असेल तर तिथे अतिरिक्त घर्षण होऊन यान पेट घेऊ शकते आणि दोन्हीही अंतराळवीरांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती रुडोल्फी यांनी व्यक्त केली आहे.
आता NASA सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर यांना परत आणण्यासाठी काय पाऊल उचलते बघावे लागेल.
हे पण वाचा
https://shorturl.at/IxOcD