Sunita Williams stuck in space: सुनीता विलियम्स पृथ्वीवर परत येण्यासाठी फेब्रुवारी 2025 पर्यंत वाट बघावी लागणार

Sunita Williams and Butch Wilmore

Sunita Williams return to Earth कधी परतणार सुनीता विल्यम्स अंतराळामधून?

 

Sunita Williams and Butch Wilmore
Sunita Williams and butch Wilmore stuck in space

 

Sunita Williams Stuck:  भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि  बूच विलमोर यांची पृथ्वीवर परतण्याची वाट पूर्ण जग बघत आहे NASA च्या  एका अंतराळ मोहिमेसाठी हे दोघेजण 5 जून रोजी इंटरनॅशनल स्पेस सेंटर या ठिकाणी गेले होते तर मागील 70 दिवसापासून हे दोघेजण या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थान International space center) मध्ये अडकून पडले आहेत जी मोहीम 8  दिवसांमध्ये पूर्ण होणार होती ती यानाच्या तांत्रिक बिघाडीमुळे वाढत गेली आणि आता वेळ अशी आली आहे की जवळपास 70 दिवसापेक्षा जास्त दिवस होऊनही हे अंतराळवीर पृथ्वीवर अजूनही परतू शकले नाही. याना मध्ये तांत्रिक बिघाड होऊन हेलियम गळती होत होती त्यामुळे नासा ने त्यांना तिथेच थांबण्याचे निर्देश दिले होते.  NASA सर्वोत्परी प्रयत्न करत आहेत की ज्यामुळे ते दोघेजणी पृथ्वीवर परत येऊ शकतील हे सर्व घडण्याची आता एकेक कारण नासाकडून समोर येत आहे पाच जून रोजी जी मोहीम सुरू झाली होती त्या यानाचं नाव होतं बोईंग स्टारलाइनर या बोईंग स्टारलाइनर मध्ये जे थ्रस्टर असतात  जे की यानाला गती देण्याचे काम करतात त्या  थ्रस्टर मध्ये काही तांत्रिक बिघाडी झाली होती.  तरीही ते या इंटरनॅशनल स्पेस सेंटर पर्यंत सुखरूप पोहोचले याना मध्ये 28 थ्रस्टर होते  त्यापैकी पाच  हे प्रवासाच्या दरम्यानच बिघडले होते आणि त्यामुळेच हेलियम गळती होत होती  या कारणामुळे सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर हे त्या अंतराळ मध्ये अडकून पडले.

 कसे परत येऊ शकतील अंतराळवीर?

NASA  च्या समोर दोघांना सुखरूप पृथ्वीवर  परत आणण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यांना परत आणण्यासाठी नासा Elon Musk यांची कंपनी Space x ची मदत घेऊ शकते. जर सर्व काही सुरळीत असेल तर space x च्या ड्रॅगन कॅप्सूल ने पृथ्वीवर परतू शकतात पण या सर्वासाठी लागणारा वेळ हा चिंतेचा विषय आहे .या कॅप्सूल द्वारे ते फेब्रुवारी 2025 पर्यंत पृथ्वीवर पोहचू शकतील.

 

 

 

Sunita Williams and Butch Wilmore
Sunita Williams आणि Butch Wilmore Boing Starlainer यानात अंतराळामध्ये अडकून पडले आहेत?

 

नाहीतर वाफ पण होऊ शकतात दोन्ही अंतराळवीर.

Astronaut Sunita William and Butch Gilmore

हे international space station मधून पृथ्वीवर परत येण्यासाठी 3 मोठे संकट त्यांचा समोर असतील अशी धास्तावणारी शंका अमेरिकी लष्कर अंतराळ कमांडर  रुडोल्फी यांनी व्यक्त केली आहे. बोईंग स्टार लाइनर कॅप्सूल हे पृथ्वीवर परत येण्यासाठी योग्य दिशेत आणि योग्य कोणात असणे फार गरजेचे आहे ते जर योग्य दिशेत योग्य कोणामध्ये नसेल तर हे संभाव्य धोके होण्याची शक्यता जास्त आहे.

1.स्टार लाइनर अपेक्षित ठिकाणी ठेवले गेले नाही तर ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतेवेळी  परत स्पेस मध्ये फेकल्या जाऊ शकते आणि यामुळे अंतराळवीर हे स्पेस मध्येच अडकून पडतील आणि त्यांच्याकडे फक्त 96 तासांचाच ऑक्सिजन  साठा शिल्लक असेल.

2. दुसरा धोका असा की अंतराळवीरांना जर पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करता आला नाही तर ते अंतराळामध्येच अडकून पडतील आणि त्यांना तिथेच संकटाचा सामना करावा लागेल.

3. पृथ्वीवर येण्यासाठी यान जर चुकीच्या कोणामध्ये येत असेल तर तिथे अतिरिक्त घर्षण होऊन यान पेट घेऊ शकते आणि दोन्हीही अंतराळवीरांचा  मृत्यू होऊ शकतो अशी भीती रुडोल्फी यांनी व्यक्त केली आहे.

आता NASA सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर यांना परत आणण्यासाठी काय पाऊल उचलते बघावे लागेल.

 

 

हे पण वाचा

https://shorturl.at/IxOcD

Shahrukh khan recieved Pardo Alla Carriera Award 77 व्या Locarno Film Festival madhe अवॉर्ड मिळणारा पहिला भारतीय

 

 

 

 

Shahrukh khan recieved Pardo Alla Carriera Award 77 व्या Locarno Film Festival madhe अवॉर्ड मिळणारा पहिला भारतीय

शाहरुक खान ला Locarno Film Festival मध्ये Pardo Alla Carriera अवॉर्ड ने सन्मानित केल्यानंतर अभिवादन करताना

Shah rukh Khan ने परत उंचावली भारताची मान locarno Festival मध्ये सन्मान.

शाहरुक खान ला Locarno Film Festival मध्ये Pardo Alla Carriera अवॉर्ड ने सन्मानित केल्यानंतर अभिवादन करताना
Shah Rukh Khan la Locarno Film Festival मध्ये Pardo Alla Carriera Award हा सन्मान मिळवणारा प्रथम भारतीय

 

Shahrukh khan: हे नाव गेल्या 2 दशकापासून आपल्या कलेने आपल्या स्क्रीन प्रेसेन्स ने  भारत च नव्हे तर अख्या जगाला मोहित करून टाकत आहे. SRK  चे चाहते जगभर आहेत एवढेच नाही तर hollywood चे मोठं मोठे कलाकार सुद्धा शाहरुख खान चे फॅन आहेत.भारता बाहेर जर कुठला कलाकार असेल की ज्याला सर्वात जास्त पसंत केल्या जात तर तो म्हणजे शाहरुख खान.  नुकताच शाहरुख चा 77 व्या  Locarno Film Festival मध्ये Pardo Alla Carriera Award ने सन्मान झाला या सोहळ्यामध्ये King khan ला करियर आचिएव्हमेंट अवॉर्ड ने सन्मानित कऱण्यात आले.  हा पुरस्कार घेताना शाहरुख खान ने सर्व प्रेक्षकांना धन्यवाद दिले तसेच आपल्याला असा अवॉर्ड दिलाय की ज्याचं मला नाव सुद्धा घ्यायला अवघड जातंय अस मिश्कील पणे उत्तर दिलं. या वेळी शाहरुखने आपल्या तोडक्या इटालियन भाषेत संवाद साधायचा प्रयत्न केला आणि आपल्या खास हाताची पोझ देऊन हॉल मध्ये रंगत आणली.

   चर्मिंग लुक मध्ये दिसला किंग खान

या सोहळ्याला शाहरुख  ब्लॅक ब्लेझेर  आणि लांब केस अश्या  चर्मिंग लुक मध्ये दिसला पण खास आकर्षण होत ते म्हणजे त्यांच भाषण  आपल्या भाषणात त्यांनी सिनेमा बद्दल तसेच फेस्टिवल बद्दल आपले विचार मांडले. Shahrukh khan ने नेहमीच भारताचा कलाकार या नात्याने  सन्मान वाढवला आहे.

Shahrukh khan अवॉर्ड सोबत
Locarno film festival

 

आपले गाण्याचे बोल खरे करून दाखवले.

90 च्या दशकात शाहरुख खान चा येस बॉस हा सिनेमा आला होता त्या सिनेमातील गाणे होते चांद तारे तोड लावू सारी दुनिया पर मे छावू बस इतना सा ख्वाब हे, असे बोल असणारे हे गाणे Shahrukh khan  ने  सत्यात उतरवले असे आपल्याला आज अश्या सन्माना ने बघायला मिळते.

Loksabha Election Dates 2024. लोकशाहीच्या महोत्सवाचं बिगुल वाजलं. कोण जिंकेल 2024 च्या लोकसभेचा महासंग्राम?

Loksabha Election 2024

Loksabha Election Dates 2024  लोकसभा निवडणूक 19 एप्रिल ला सुरवात निकाल 4 जून रोजी. महाराष्ट्रात ५ टप्प्यात तर 

देशभरात  एकूण 7 टप्पात पार पडणार निवडणूका

Loksabha Election 2024

Loksabha Election Dates 2024 :लोकशाही चा सर्वात मोठा उत्सव असनाऱ्या लोकसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या.लोकसभेच्या ५४३ जागांसाठी 19 अपील ते १ जून रोजी मतदान पार पडणार आहे.  देशभरात एकुण 7 टप्यात हा निवडणुकीचा उत्सव होणार आहे तर महाराष्टात ५ टप्यामध्ये मतदान पार पडणार आहेत.शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हि माहिती दिली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील 81 दिवस आचारसंहिता लागू असणार आहेत म्हणजेच  या कालावधीमध्ये  कोणतेही धोरणात्मक निर्णय हे घेतले जाऊ शकत नाही.

Loksabha Election Dates 2024  जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणूकिमध्ये 97 कोटी मतदार  उमेदवाराचं भविष्य ठरवणार. या निवडणुकीत 1.82 कोटी तरुणाई प्रथमच मतदान करणार आहे.

महाराष्ट्रात होणार सुरवातीच्या 5 टप्प्यात मतदान

पहिला टप्पा- 19 एप्रिल

दुसरा टप्पा- 26 एप्रिल

तिसरा टप्पा- 7 मे

चवथा टप्पा-13 मे

पाचवा टप्पा- 20 मे

सहावा टप्पा- 25 मे

सातवा टप्पा- 1 जून

 

Loksabha Election dates 2024

 

 

Loksabha Election Dates 2024

हे पहिल्यांदाच

Vote from home  85 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती ह्या घरी बसून टपालाने मतदान करू शकतील.

20 वर्षात प्रथमच निकाल जून महिन्यात.

AI  चा वापर होणारी लोकसभेची पहिलीच निवडणूक

 

Join us on

You tube  https://www.youtube.com/@thelearnersacademy6789

Facebook

https://www.facebook.com/profile.php?id=61550688560073&mibextid=ZbWKwL

ऑस्कर अवॉर्डस 2024 मध्ये Oppenheimer ची धूम Oscar awards winner 2024 Oppenheimer crowned best picture

ऑस्कर अवॉर्ड 2024 मध्ये  ‘OPPENHEIMER’ ने मारली बाजी बेस्ट अक्टर आणि बेस्ट फिल्म सोबत 7 ऑस्कर पुरस्कारावर कोरले नाव

96th Academy Awards : नुकत्याच लॉस एंजलिस इथल्या डॉल्बी थिएटर मध्ये झालेल्या 96 व्या ऑस्कर अवॉर्डस मध्ये  क्रिस्तोफर नोलान यांच्या Oppenheimer ने तब्बल 7 पुरस्कार पटकावत गोल्दन ग्लोब अवार्ड्सनंतर आपला  दबदबा इथे पण कायम ठेवला.  ओपनहायमर ला सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता यांच्यासोबत  एकूण सात  पुरस्कार मिळाले.तसेच या चित्रपटाने तब्बल तेरा  वेगवेगळ्या श्रेणीमध्ये नामांकन मिळवली होती तेव्हापासूनच हा चित्रपट बाजी मारणार हे दिसत होतं . या अकॅडमी अवार्ड मध्ये पुअर थिंग्स साठी एमा स्टोन ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार देण्यात आला यासोबतच चित्रपटाने ने देखील चार ऑस्कर अवॉर्डस पटकावले.

 

ऑस्कर अवॉर्ड 2024

 

ऑस्कर अवार्डस विनर लिस्ट

सर्वोत्तम चित्रपट : ओपनहायमर  (Oppenheimer )

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक:ख्रिस्तोफर नोलन (ओपनहायमर)

सर्वोत्कृष्ट  अभिनेता :सिलियन मर्फी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: एमा स्टोन ( पुअर थिंग्स)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर (ओपनहायमर)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- डा’वाइन जॉय रैंडोल्फ (द होल्डओवर्स)

सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर- लुडविग गोरानसन(ओपनहाइमर)

– सर्वोत्कृष्ट साउंड- द जोन ऑफ इंटरेस्ट

– सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म- द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर

– सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी- ओपनहाइमर

 

Oscar awards 2024

ऑस्कर अवॉर्डस 2024 या साठी होता विशेष

सिलियन मर्फी ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा Oppenheimer साठी पुरस्कार मिळाला हा पुरस्कार मिळणारा तो पहिला आयरिश अभिनेता ठरला आहे.

आयर्नमॅन अर्थात रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर ला त्याचा कारकिर्दीचा  पहिला ऑस्कर अवॉर्ड हा ओपनहायमर साठी मिळाला. याआधी त्याला 3 वेळेस नामांकन मिळाली होती.

 

 

 

हे ही वाचा

india vs pakistan cricket match tickets T20 world cup 2024 भारत विरुद्ध पाकिस्तान

india vs pakistan cricket match tickets T20 world cup 2024 भारत विरुद्ध पाकिस्तान

न्यूयॉर्कमध्ये भारत-पाक  आमने सामने सामना पाहण्यासाठी येणार लाखो चा खर्च india vs pakistan cricket match

india vs pakistan cricket match tickets

T20 विश्वचषक हा येत्या 2 जून पासून सुरू होईल जी यु एस मधील आयसीसी ची पहिली वरिष्ठाची स्पर्धा असेल ही स्पर्धा अमेरिका व वेस्टइंडीज यांच्या संयुक्त विद्यमानाने खेळली जाणार आहे.या  स्पर्धेचे सगळ्यात मोठे आकर्षण असणार आहे ते म्हणजे 9 जून रोजी युयस मधील नासाउ काऊंटी स्टेडियमवर होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारत आणि पाकिस्तान जेव्हा जेव्हा क्रिकेट सामना होतो त् त्यावेळेस पूर्ण जगभरातून चाहत्यांचे या सामन्याकडे लक्ष असते. आणि याच सामन्यामुळे तिकिटांच्या किंमतीही या खूप वाढतात कित्येक पटीने किमती आपल्याला वाढलेल्या बघायला मिळतात.आयसीसीच्या संकेतस्थळावर 33 हजार रुपये या सामन्याची टिकटाची  किंमत आहे. त्याची पुनरविक्री  ही स्टबहब  व सीटगीग अशा काही संकेतस्थळावर ही 41 लाखापर्यंत पोचली आहे. सरासरी आपण एका प्रेक्षकाला एका तिकिटे मागे किती खर्च येईल हा अंदाज जर काढला तर कुठल्याही एका भारतीय चाहत्याला 14000 रुपयाची एक सामान्य तिकीट मिळेल मात्र अमेरिकेत सामना पाहण्यासाठी त्याला प्रवास राहण्याची व्यवस्था आणि इतर खर्च धरून दीड लाख पर्यंत खर्च येऊ शकतो.

india vs pakistan cricket match tickets

भारताचे स्वस्त तिकीट हे 7000 तर इतर संघाचे तिकीट 500 पासून सुरू

 

या स्पर्धेतील सर्वात महाग तिकिट ही भारताच्या सामन्याची आहे त्यांची सर्वात स्वस्त तिकीट सुमारे सात हजार रुपये आहे तर पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्याची किमान किंमत सुमारे 14 हजार रुपये आणि कॅनडाविरुद्ध बारा हजार रुपये आहे मात्र भारत आयर्लंड पाकिस्तान अमेरिका आणि कॅनडाची जवळपास सर्व तिकिटे विकली गेली आहेत.

Supreme court strike down over electrol bond scheme un stop scheme immediately 1

सुप्रीम कोर्टाने ‘Elctrol bond ‘  वरून पिळले मोदी सरकारचे कान

Electrol bond : सुप्रीम कोर्टाने गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी मोदी सरकारची इलेक्ट्रॉल बोंड  वरून मोदी सरकारच्या योजने वर ही घटना बाह्य असून कलम 19 (1)  a च उल्लंघन करणारी आहे असे सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहे.

काय आहे Electol Bond ?

इलेक्ट्रॉल बॉण्ड म्हणजेच कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने राजकीय पक्षांना देण्यात आलेला निधी किंवा रोखे ही पैशाच्या स्वरूपात नसून त्याच पैशाच्या बोंड रुपी ही देणगी म्हणून देण्यात येते आणि त्याची कुठलीही मर्यादा व्यक्तीला किंवा संस्थेला नव्हती या गोष्टीवरच सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेत यामध्ये पारदर्शीपणा नाही असं ठणकावून सांगितलं आहे.

कोणत्या व्यक्तीने किंवा संस्थेने कुठल्या पक्षाला किती निधी दिला आहे ते सामान्य मतदाराला किंवा त्या पक्षाच्या मतदाराला हे कळणे आवश्यक आहे तसेच सुप्रीम कोर्टाने  स्टेट बँक ऑफ इंडिया ला असे निर्देश दिले आहेत की त्यांनी 31 मार्चपर्यंत ज्या व्यक्तीने इलेक्ट्रॉल बॉण्डच्या साह्याने कुठल्या पक्षाला किती निधी दिला आहे ते निवडणूक आयोगाला कळवणे आवश्यक आहे आणि त्याची 31 मार्च ही शेवटची तारीख आहे 31 मार्चनंतर निवडणूक आयोगांना असे निर्देश आहेत की निवडणूक आयोगाने त्याच्या संकेतस्थळावरती किंवा वेबसाईट वरती त्या देणगीदाराची यादी आणि रक्कम ही अपलोड करणे अपेक्षित आहे जेणेकरून कुठल्या पक्षाला किती निधी मिळाला आहे हे कळेल. 2016 मध्ये आलेली ही मोदी सरकारची Electrol Bond  स्कीम आता यापुढे सुरू ठेवता येणार नाही ती घटनाबाह्य आहे या मध्ये पारदर्शीपणा दिसून येत नाही  असे सुप्रीम कोर्टाने सांगून ह्या स्कीमला बंद करण्याची आदेश देेेऊन केंद्र सरकारला दणका दिला आहे.

 

ECI rules Ajit pawar faction is the real NCP

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे

NCP :महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप झाला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस च्या पक्ष सुनावणीच्या  निकाल दिला.  राष्ट्वादी पक्ष आणि चिन्ह हे आता अजित पवार गटाला मिळाले आहे. शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे . निवडणूक आता काही महिन्यावर येऊन ठेपली असता हा शरद पवार यांना खूप मोठा धक्का बसला आहे. तसेच महाराष्ट्रच राजकारण परत एकदा उलथापालथीने तापले आहे . ज्या प्रमाणे एकनाथ शिंदे नि बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह आपल्या नावे केला आणि आता  अजित पवार यांनी सुद्धा संख्या बळाच्या जोरावर पक्ष आपल्या नावे केला आहे.

ncp Maharashtra political crisis

 

या निर्णयावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना हा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो असे म्हटले आहे, तसेच  इतर विरोधी पक्ष व शरद पवार गटाने या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करक्त हा निकाल अनपेक्षित असा आहे आहे अशी प्रतिक्रिया देताना दिसतोय. शरद पवार  आता सुप्रीम कोर्टात या निर्णयाला आव्हान कसे देतील आणि यावर परत सुप्रीम कोर्ट काही वेगळं निर्णय देईल का आता हे सर्व बघण्यासारखं आहे .

Oscar 2024 Nomination ऑस्कर 2024 साठी नामांकन जाहीर

Oscar 2024: ऑस्कर ची नामांकन यादी जाहीर! ओपनहायमर आणि बार्बी शर्यतीमध्ये.

Oscar nomination 2024: ऑस्कर 2024 साठी ची नामांकन यादी जाहिर झाली आहेत. याची अधिकृत घोषणा ट्विटर वरून करण्यात आली. 96 व्या अकादमी पुरस्कारामध्ये ‘ ओपन हायमर’ , बार्बी, नेपोलियन ते मेस्ट्रो यासारख्या चित्रपटाने आपला दबदबा निर्माण केला.

oscar पुरस्काराची यादी 23 जानेवारीला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी जाहीर करण्यात आली

वेगवेगळ्या श्रेणीत नामांकन मिळालेली चित्रपटाची यादी खालील प्रमाणे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट:

बार्बी

माईस स्ट्रॉ

ओपनहायमर

किलर्स ऑफ द फ्लॉवर मून

गिरणा

सर्वोत्कृष्ट अभिनेता:

सिलियन मर्फी – ओपेनहायमर

जेफ्रि राईट- अमेरिकन फिक्शन

पॉल गियामट्टी- होल्डओव्हर्स

ब्रॅडली कूपर – माईस्ट्रॉ

कोलमन डेमिंगो- रस्टीन

सर्वाधिक नामांकन हे ओपनहायमर

आणि त्यानंतर बार्बी चित्रपटाला मिळालीआहेत.

टू किल अ टायगर‘ हा एकमेव भारतीय मूवीचा ऑस्कर 2024 च्या नामांकाना मध्ये समावेश करण्यात आला आहे.ह्या चित्रपटाला डॉक्युमेंट्री फिक्शन प्रकारात नामांकन यादीत स्थान मिळाले आहे.

96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा 10 मार्च 2024 रोजी पार पडणार आहे.

DR. Babasaheb Ambedkar Tallest Statue Inaugration. ‘Statue of social justice’ डॉ आंबेडकरांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण.

Statue of Social Justice

डॉ बाबासाहेब आंबेडकर उच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री एस. जगमोहन रेड्डी यांचा हस्ते विजयवाडा येथे थाटामाटात झाले. ‘स्टेचू ऑफ सोशल जस्टीस’ ह्या नावाने हा पुतळा उभा राहला असून त्याची जमिनीपासून उंची 206 फुट आहे, आतापर्यंत तेलंगाना मध्ये डॉ आंबेडकरांचा 175 चा पुतळा सर्वात उंच मानला जात होता. फुट चबुतऱ्यावर उभारण्यात आली आहे.. हा पुतळ्याचा जगातील सर्वात उंच 50 पुतळ्यामध्ये समावेश होयील .

पुतळ्याची जागा स्वराज मैदानासह परिसराचा देखील पुनर्विकास करण्यात आला. परीसरामध्ये जलकुंभ आणि इतर सुविधांचीसुधा काळजी घेण्यात आली आहे.याशिवाय डॉ आंबेडकरांचाजीवनपट दाखववणारया LED स्क्रीनदेखील लावण्यात आल्या आहेत.याशिवाय 2000 आसन क्षमतेचे कॉन्फरन्स सेंटर 8 हजार स्क्वेअर फुटांचे फूड कोर्ट, संगीतमय पाण्याचे कारंजे आणि मुलांचे खेळाचे क्षेत्रदेखील बांधण्यात आले आहे. आजपासून पुतळा सर्वासाठी खुला होणार आहे. हे महाशिल्प केवळ राज्याचे नसून तर देशाचे प्रतिक आहे असे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी म्हटले आहे.

Dr. Ambedkar statue of social justice

या पुतळ्याची खास वैशिष्टे

जगातील सर्वांत उंच डॉ. अम्बेड्करांचा पुतळा 125 फुट उंच आणि 81 फुट उंच चबुतऱ्यावर थाटात उभा.

हिरवागार उद्यानात 18.81 एकरात वसलेला.

या पुतळ्याकरिता 400 टनस्टील वापरण्यात आले आहे.

पुतळा बनवण्यासाठी 404.35 कोटी खर्च करण्यात आला आहे.

कच्चा माल ते डीसायनींग मेड इन इंडिया प्रकल्पा अंतर्गत केले आहे.

Why Japan is successful?

जपान इतका यशस्वी का आहे? Why Japan is Successful? जपानच्या यशाचे श्रेय ऐतिहासिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक घटकांच्या संयोजनाला दिले जाऊ शकते. जपानच्या यशाची काही प्रमुख कारणे येथे आहेत.

औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरण: 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मेईजी पुनर्संचयित करणे हे जपानसाठी एक महत्त्वाचे वळण ठरले. देशाने आपली सांस्कृतिक ओळख जपत पाश्चात्य राष्ट्रांकडून प्रेरणा घेऊन आपली अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि लष्करी वेगाने आधुनिकीकरण केले.

Success of Japan…..

शिक्षण आणि कार्य नैतिकता: जपानमध्ये शिक्षणावर जोरदार भर दिला जातो आणि कठोर परिश्रम, शिस्त आणि सतत सुधारणांना महत्त्व देणारी संस्कृती आहे. यामुळे अत्यंत कुशल आणि प्रेरित कर्मचारी वर्गाला हातभार लागला आहे.

मजबूत औद्योगिक पाया: जपानच्या वैविध्यपूर्ण आणि प्रगत औद्योगिक पायामुळे त्याला उत्पादन आणि निर्यातीत उत्कृष्टता प्राप्त झाली आहे. टोयोटा, सोनी आणि पॅनासोनिक सारख्या कंपन्या आंतरराष्ट्रीय आयकॉन बनल्या आहेत. सरकारी धोरणे: पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक, संशोधन आणि विकास आणि प्रमुख उद्योगांना पाठिंबा यासह प्रभावी सरकारी धोरणांनी जपानच्या यशात भूमिका बजावली आहे.

दीर्घकालीन दृष्टी: जपानी कंपन्या बर्‍याचदा अल्पकालीन नफ्यांपेक्षा दीर्घकालीन उद्दिष्टे आणि शाश्वत वाढ यांना प्राधान्य देतात. या दृष्टिकोनामुळे त्यांना आर्थिक चढउतार आणि स्पर्धात्मक राहण्यास मदत झाली आहे.

इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी: जपान नावीन्य आणि तंत्रज्ञानामध्ये जागतिक आघाडीवर आहे. इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोटिव्ह, रोबोटिक्स आणि बरेच काही यासारख्या क्षेत्रात ग्राउंडब्रेकिंग उत्पादने तयार करण्याचा त्याचा इतिहास आहे.

  • सांस्कृतिक मूल्ये: जपानी संस्कृती टीमवर्क, सुसंवाद आणि अधिकाराचा आदर यावर महत्त्व देते. या मूल्यांमुळे सामाजिक स्थैर्य आणि एकसंध कामाचे वातावरण निर्माण झाले आहे.