ते 127 तास आणि तो

 

 

 

 

ही गोष्ट आहे एका सहाशी माणसाची, ही गोष्ट आहे एका निर्भीड आणि जगण्याचा आनंद भरभरून घेणाऱ्या एका व्यक्तीची आरोन  राल स्टोन असं या सहासी माणसाचं नाव पर्वत रोहक नैसर्गिक साधन संपत्ती मध्ये फिरून जगण्याचा आनंद घेणारी व्यक्ती  ते मरणाला हुलकावणी देऊन परतणारा प्रेरणादायी वक्ता असा त्याचा प्रवास आणि नेहमी मृत्यूला झुंज देण्याची त्यांची धडपड तसाच काही हा प्रसंग आरॉन नेहमीप्रमाणे आपल्या पर्वतरांगा चढण्यासाठी तयारी करत होता. पण या वेळेस पर्वतरांगा चालण्यासाठी तो कुणाजवळही बोलला नाही मित्राकडे ही तो बोलला नाही आणि परिवारांना ही गोष्ट माहिती नव्हती या वेळेस त्याने स्वतः विचार केला होता की मी एकटाच जाईल आणि दोन-तीन दिवस निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहील  हीच गोष्ट पण समोर चालून त्यांला खूप दुःखदायक ठरली आणि त्याला कसा पस्तावा झाला ते आपण समोर बघूया चला तर मग सुरू करुयात. अरोन एक मोठी पर्वतरांग चढण्याच्या तयारीत होता  आणि चढण्यासाठी त्यांनी सगळी तयारीही केली त्या कठीण पर्वतरांगेवर चढला सुद्धा पण समोर त्याचा सोबत काय होणार होते हे त्याला सुद्धा माहिती नव्हतं याच्यानंतर त्याची गाठ मृत्यूशी पडणार होती झालं असं की एका छोट्याशा फटी मधून निघत असताना त्यांचा तोल गेला आणि तो एका फट्टी मध्ये अडकला पण त्या फटीमध्ये अडकल्यानंतर तेवढ्यावरच संकट संपल नाही, तर एक भला मोठा दगड हातावर ताडकन  येवून आदळतो तो यातनेने व्याकूळ होऊन जोरात जिवाच्या आकांताने ओरडतो, रडतो फटीत असलेला हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो मदतीसाठी हाका मारतो पण त्या ठिकाणी त्याचा आवाज ऐकण्यासाठी दूरदूरपर्यंत कोणीच नसतो जिवाच्या आकांताने तो ओरडत होता वाचवा वाचवा आवाज ऐकणार कोण  मागे-पुढे दूरदूरपर्यंत तिथे कोणीही नव्हतं. उजवा हात जो दगडाखाली फार फार भरडला गेला होता रक्तबंबाळ झाला होता कितीही जोर लावला तरी तो हात बाहेर पडू शकत नव्हता त्यांनी खूप प्रयत्न केले. पण खूप थकून मग तो शांत बसला थोडा वेळ त्याने विचार केला की नाही आता आपला अंत आहे त्या सगळ्या गोष्टी त्याच्या जुन्या आठवणी त्याला आठवत होत्या. जस की तो पुन्हा आयुष्याचे क्षण त्याच्या डोळ्यासमोर बघून घेत होता. मी इथून निघणार नाही माझी सुटका होणार नाही मला असाच माझा जीव इथेच गमवावा लागणार या सगळ्या गोष्टींना तो फार व्याकुळ आणि भयभीत झाला होता आणि आता हळूहळू शरीर पण त्या ची साथ सोडून देत होते. मरण्याची भिती आणि जगण्याची उमेद ही झुंज 2 दिवस चालू होती. अरोन ने त्या परीस्थितीत विचार केला की एकतर मरण कवटाळून घ्यायचे नाहीतर काही होवो इथुन बाहेर पडायचे. त्यांनी असह्य वेदना सहण करून बाहेर पडण्याचा ठाम निश्चय केला आणि खिशातील चाकूणे त्या हातावर घाव घालणे सुरू केले. असे करून त्याने तो अडकलेला हात कापून टाकला आणि सर्व शक्ती एकवटून तेथुन बाहेर पडला. आणि  काही पर्यटक तेथे आल्यामुळे तो वाचला. आज तो एक प्रेरणादायी वक्ता आहे.त्याच्या अफाट इच्छाशक्ती आणि असह्य वेदना सहन केल्या.त्याच्या जिद्दीने कितीही  संकट आले तरी त्याला कसे चित करायचे हे अरोन आपल्याला शिकवतो. त्याच्या हिम्मतीला माझा सलाम..

 

सचिन सोपानराव देबाजे