ऑस्कर अवॉर्ड 2024 मध्ये ‘OPPENHEIMER’ ने मारली बाजी बेस्ट अक्टर आणि बेस्ट फिल्म सोबत 7 ऑस्कर पुरस्कारावर कोरले नाव
96th Academy Awards : नुकत्याच लॉस एंजलिस इथल्या डॉल्बी थिएटर मध्ये झालेल्या 96 व्या ऑस्कर अवॉर्डस मध्ये क्रिस्तोफर नोलान यांच्या Oppenheimer ने तब्बल 7 पुरस्कार पटकावत गोल्दन ग्लोब अवार्ड्सनंतर आपला दबदबा इथे पण कायम ठेवला. ओपनहायमर ला सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता यांच्यासोबत एकूण सात पुरस्कार मिळाले.तसेच या चित्रपटाने तब्बल तेरा वेगवेगळ्या श्रेणीमध्ये नामांकन मिळवली होती तेव्हापासूनच हा चित्रपट बाजी मारणार हे दिसत होतं . या अकॅडमी अवार्ड मध्ये पुअर थिंग्स साठी एमा स्टोन ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार देण्यात आला यासोबतच चित्रपटाने ने देखील चार ऑस्कर अवॉर्डस पटकावले.
ऑस्कर अवार्डस विनर लिस्ट
सर्वोत्तम चित्रपट : ओपनहायमर (Oppenheimer )
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक:ख्रिस्तोफर नोलन (ओपनहायमर)
सर्वोत्कृष्ट अभिनेता :सिलियन मर्फी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: एमा स्टोन ( पुअर थिंग्स)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर (ओपनहायमर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- डा’वाइन जॉय रैंडोल्फ (द होल्डओवर्स)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर- लुडविग गोरानसन(ओपनहाइमर)
– सर्वोत्कृष्ट साउंड- द जोन ऑफ इंटरेस्ट
– सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म- द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर
– सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी- ओपनहाइमर
Oscar awards 2024
ऑस्कर अवॉर्डस 2024 या साठी होता विशेष
सिलियन मर्फी ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा Oppenheimer साठी पुरस्कार मिळाला हा पुरस्कार मिळणारा तो पहिला आयरिश अभिनेता ठरला आहे.
आयर्नमॅन अर्थात रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर ला त्याचा कारकिर्दीचा पहिला ऑस्कर अवॉर्ड हा ओपनहायमर साठी मिळाला. याआधी त्याला 3 वेळेस नामांकन मिळाली होती.
हे ही वाचा
india vs pakistan cricket match tickets T20 world cup 2024 भारत विरुद्ध पाकिस्तान