RRR आणि ऑस्कर

        RRR  ला ऑस्कर  

आर आर आर या  चित्रपटाने सगळ्या जगाला वेड लावून सोडले. या चित्रपटाने
वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले तेव्हापासूनच हा चित्रपट
ऑस्कर साठी जाणार याची खात्री पटली आणि अशा पल्लवीत झाल्या की हा चित्रपट नक्कीच
आपला ऑस्करचा दुष्काळ संपवेल आणि घडलंही तसंच प्रत्येक संगीत प्रेमी ला प्रत्येक
चित्रपट प्रेमींना आणि प्रत्येक भारतीयाला  आनंदाचा क्षण दिलाय त्याच कारण
म्हणजे 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये नाटू नाटू ची धूम बघायला मिळाली नाटू
नाटू ला ओरिजनल सॉंग कॅटेगिरी मध्ये ऑस्कर मिळाला. विजेत्याच्या नावाची घोषणा
झाली आर आर आर  आणि  सगळीकडे जल्लोषाचे वातावरण आपल्याला बघायला मिळाले
ओरिजनल सॉंग च्या कॅटेगिरी मध्ये  बाकीचे जे सॉंग होते त्यांनाही याचा खूप
आनंद झाला त्यांना न मिळालं याच्यापेक्षा आर आर आर ला मिळाल्याचा आनंद जास्त होता
आणि हीच खरी जादू या चित्रपटाची आहे. जेव्हापासून हा आर आर चित्रपट आला त्याने
जणू काही अशी मोहिनी टाकली आहे त्याला कारण हे तसंच आहे, त्या चित्रपटाचे संगीत
असो त्या चित्रपटाचे कथानक  त्या चित्रपटामध्ये केलेला दमदार अभिनय असो की
पडद्याच्या मागे काम करणारी जितके ही कलावंत असो त्या सगळ्यामुळेच हा चित्रपट
यशाच्या शिखरावर जाऊन बसला.  

सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक राजामौली,दिग्दर्शक म्हणजे
जहाजावरचा कॅप्टन जो या सगळ्या गोष्टी घडून आणतो  राजामौली ह्या
गोष्टींमध्ये बाप माणूस आहे त्याचे मागचे सिनेमे आपण जर बघितले तर त्याच्या यशाची
ही शिखर पादाक्रांत करण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही हे कळून चुकले ह्या
गोष्टीमध्ये आपल्या मेहनतीने निर्विवाद वर्चस्व गाजवले. आपण त्यांचे मखी, बाहुबली
, बाहुबली 2 हे एकापेक्षा एक सरस पिक्चर त्यांनी बनवले आणि त्या सगळ्यांचा कळस
म्हणजे आर आर आर हा चित्रपट थेटर मध्ये  बघण्याची जी मजा होती ती काही और च
होती नुसता आनंद आणि जल्लोष बस्स, ज्यावेळेस  नाटू नाटू हे गाणं तेलगू मध्ये
आणि हिंदीमध्ये त्याचं नाचो नाचो हे वर्जन आहे ज्यावेळेस हे गाणं लागतं ना
अक्षरशः ज्यांना कधी नाचणं आवडत नसेल त्याचे अंग नाचण्यासाठी आणि तालावर ठेका
धरल्याशिवाय राहणार नाही अशी मजा या गाण्यांमध्ये आहे आणि म्हणूनच या गाण्याने
अक्षरशः पूर्ण जगाला वेड लावलं. थेटरमध्ये ज्यावेळेस हे गाणं वाजले त्यावेळेस
लोक सेलिब्रेट करत होते आनंदाच्या भरामध्ये नाचत होते. ऑस्कर पुरस्कारामध्ये
सुद्धा या गाण्याचा परफॉर्मन्स झाला आणि त्या परफॉर्मन्सला स्टॅंडिंग ओव्हिएशन
मिळालं, भरभरून दाद मिळाली. तर ज्यांनी ज्यांनी हा पिक्चर  बघितला ना ही
त्यांनी हा पिक्चर आवर्जून बघितलाच पाहिजे  आणि हो आता या ऑस्कर पुरस्कारानंतर
प्रत्येक जण हा सिनेमा बघणार याच्याबद्दल दुमत नाही या पुरस्काराबद्दल आर आर आर
च्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद हा
पिक्चर देऊन पूर्ण भारतीयांना संपूर्ण जगाला आनंद देण्यासाठी आणि ऑस्कर पुरस्कार
जिंकल्यानंतर अभिमानाचे क्षण जगण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.